Photo – विठूमाऊलीचे नित्य राजोपचार सुरू; पंढरपुरात भक्तीभावात प्रक्षाळपुजा संपन्न

पंढरपुरमध्ये आषाढी एकादशी सोहळा 17 जुलै रोजी संपन्न झाला. श्री विठ्ठलास व श्री रूक्मिणीमातेस पहाटे होणारी श्रीची काकडा आरती, नित्यपुजा, महानैवेद्य, पोषाख, धुपारती व शेजारती इथपर्यंतचे सर्व राजोपचार परंपरेनुसार आजपासून सुरू करण्यात येत आहेत.

26 जुलैच्या मुहूर्तानुसार श्री विठ्ठलाची व श्री रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न झाली.

दरवर्षी यात्रेला भाविकांची गर्दी लक्षात घेता, चांगला महुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते.

7 जुलै रोजी श्रींचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला होता.

श्री विठ्ठलास लोड व श्री रूक्मिणी मातेस तक्क्या देण्यात आला होता. त्यामुळे श्रींची काकडा आरती, पोषाख, धुपारती, शेजारती इत्यादी नित्योपचार प्रक्षाळपुजेपर्यंत (दिनांक 26 जुलै) बंद ठेवून भाविकांना जास्तीत जास्त वेळ दर्शन उपलब्ध करून देण्यात येत होते. प्रक्षाळपुजा संपन्न झाल्यामुळे श्रींचा पलंग शेजघरामध्ये ठेवण्यात आला. तसेच श्रींचे सुरू असणारे 24 तास दर्शन बंद होऊन, सर्व नित्यराजोपचार सुरू होत आहेत.