#MumbaiRains मुंबई उपनगरात पावसाची दमदार हजेरी

मुंबई आणि उपनगरात बुधवारी रात्री पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात झाली. तसेच मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.  मुसळधार पावसामुळे उपनगरीय रेल्वे गाड्यांवरही परिणाम दिसून आला.

Displaying DSC_5166.jpg

कोकण किनारपट्टीवर पुढील काही दिवसांत 200 एमएम ते 500 एमएम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Displaying DSC_5206.jpg

मुंबईला आज येलो, ठाणे-पालघरला ऑरेंज अलर्ट, तर रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Displaying DSC_5214.jpg

दक्षिण मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने कुलाबा, फोर्ट, मलबार हिल, चर्चगेट आणि जवळपासच्या इतर भागात पुढील 2 तासांत मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Displaying DSC_5266.jpg

दिवसभरात एकूण पाऊस 50-60 मिमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Displaying DSC_5243.jpg

मुंबई महापालिकेने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Displaying DSC_5249.jpg

सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश आहेत. तसेच आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.