
रेल्वेची मुंबईकरांशी असलेली नाळ ही जगजाहीर आहे. त्यामुळेच मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी दर रविवारी विविध यांत्रीक कामांसाठी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर काही काळासाठी मेगाब्लॉक घेतला जातो. आता पावसाचे दिवस सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये तुफान पाऊस पडत आहे. आज सुद्धा पावसाने मुंबईमध्ये दमदार हजेरी लावली. असे असले तरी भर पावसामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य निर्विवादपणे पार पाडले.
मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.05 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात आला.
रंगीबेरंगी रेनकोट परिधान करून कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडले.
हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला.
विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात आला होता.