Photo – शिवप्रेमींचा एकच नारा! गद्दारांना जोडे मारा!! जय शिवराय… हर हर महादेव गर्जनेने फोर्ट परिसर दुमदुमला

मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्रभरात संतापाची लाट आहे. महायुती सरकारविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज सरकारला ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले. मुंबईसह राज्यभरातील हजारो शिवप्रेमी शिवसन्मानासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आंदोलनात सहभागी झाले. ‘हर हर महादेव’चा नारा देत समस्त शिवप्रेमी मावळ्यांनी गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे आगेपूच केली. शिवप्रेमींचा एकच नारा होता, गद्दारांना जोडे मारा, जोडे मारा.

Displaying FB_IMG_1725191725349.jpg

गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार छत्रपती शाहू महाराज नतमस्तक झाले.

Displaying 20240901_150555.jpg

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेट वे ऑफ इंडियाकडे मार्गक्रमण करत असताना रिगल सिनेमाजवळील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पांजली वाहिली.

Displaying FB_IMG_1725191738164.jpg

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भगवा झेंडा हाती घेत आंदोलनात उतरले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सोबत होते.

Displaying DSC_3551.jpg

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना नेते संजय राऊत आंदोलनात सहभागी झाले होते.

Displaying DSC_3478.jpg

या आंदोलनात शिवसेनेच्या रणरागिणी प्रचंड आक्रमक झाल्या. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिली नसल्याचे त्यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता, अटक झाली तरी चालेल, महाराजांसाठी गोळय़ा खायलाही तयार आहोत, पण ‘जोडे मारा’ आंदोलन होणार म्हणजे होणारच, असे शिवसेनेच्या रणरागिणींनी ठामपणे सांगितले. मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. कोणाला पंत्राट देता मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या मित्रांना, काय घरची खेती आहे का? तुमच्या घरातला सातबारा आहे का? असा संतप्त सवाल शिवसेनेच्या रणरागिणींनी यावेळी केला.

Displaying DSC_3534.jpg

हजारोंच्या संख्येने आलेल्या शिवप्रेमींमध्ये बाल मावळ्याची उपस्थिती लक्षवेधी ठरली. मावळ्यांच्या वेशभूषेत आलेल्या विरार येथील तीन वर्षीय समर्थ आदावडे याने सर्वांची मनं जिंकली. अनेकांनी समर्थसोबत सेल्फी घेतला व त्याचे कौतुक केले.

Displaying DSC_1878.jpg

महाराज, आम्हाला माफ करा, अशी भावना समस्त शिवप्रेमींनी व्यक्त केली.

Displaying DSC_2194.jpg

महाविकास आघाडी कार्यकर्त्यांनी सरकारच्या निषेधार्थ जोडय़ांच्या हार दाखवला.

निषेधाचे लक्षवेधी फलक

n महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या हातात सरकारचा निषेध करणारे लक्षवेधी फलक होते. प्रत्येकाच्या मनात महाराजांचा पुतळा कोसळल्याचे दुःख होते. ‘राजे आम्हाला माफ करा’ अशा भावना ते व्यक्त करत होते. त्याच वेळी ‘गद्दारांना करू गपगार, माफी नाही हद्दपार…’ अशा इशाराही ते देत होते.
n ‘जोडे मारा’ आंदोलनात महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्या मोठय़ा संख्येने उतरल्या. महिलांनी भ्रष्टाचारी महायुती सरकारचा निषेध केला. खोके सरकारचा धिक्कार केला. ‘जय भवानी, जय शिवाजी…तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय’ अशा घोषणा महिलांनी दिल्या.
n छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान. महाराजांचा अवमान कदापि सहन केला जाणार नाही, अशा भावना आंदोलनात सहभागी प्रत्येक कार्यकर्त्याच्या होत्या.