टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना 23 ऑक्टोबर पासून पुण्यामध्ये सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा 8 विकेटने पराभव करत इतिहास रचला. 36 वर्षांनी न्यूझीलंडच्या संघाने हिंदुस्थानात पहिला सामना जिंकला. त्यामुळे दुसरा सामना जिंकत मालिका खिशात घालण्यासाठी न्यूझीलंडचा संघ प्रयत्नशील असेल. मात्र, दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करून सामना बरोबरीत सोडवण्यासाठी रोहित सेना सज्ज झाली आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर टीम इंडियासह न्यूझीलंडच्या खेळाडूंनी कसून सराव केला.
सराव करताना खेळाडूंचे फोटो सामना प्रतिनिधी चंद्रकांत पालकर यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपले आहेत.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने सरावा दरम्यान खेळपट्टीची चाचपणी केली.
पहिल्या कसोटी सामन्यात केलेला दमदार खेळ दुसऱ्या सामन्यातही कायम ठेवण्यासाठी न्यूझीलंडच्या संघाने कसून सराव केला.
पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी विराट कोहली, रवींद्र जडेजा, यशस्वी जयस्वालसह सर्वच खेळाडूंनी मैदानावर घाम गाळला.
विराट कोहलीने फलंदाजीचा कसून सराव केला असून न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बरसण्यासाठी तो सज्ज झाला आहे.
सरावा दरम्यान बॅटची चाचपणी करताना विराट कोहली, यशस्वी आणि के एल राहुल.
सलामीवीर यशस्वी जयस्वालने सराव सत्रात तडाखेबंद फलंदाजी करत आपले इरादे स्पष्ट केले.
न्यूझीलंडचे खेळाडू सराव करताना