Photo – स्टोन स्टडेड फिश कट लहेंगामध्ये जान्हवी कपूरच्या मादक अदा

नुकत्याच पार पडलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला जान्हवी कपूर हिने आयवरी रंगाचा स्टोन स्टडेड फिश कट लेहंगा परिधान केला होता.

जान्हवीच्या या फिश-कट लेंहग्यावर हाताने भरतकाम केलेले आहे. त्यावर सिक्वीन्स, मोती आणि क्रिस्टल्स लावले आहेत. तसेच या लेंहग्यावर हिऱ्यांनी सुशोभित केलेला कॉर्सेट देखील होता. या लेहंग्यावर फक्त स्टोन स्टडेड कानातले घातले होते. जान्हवी कपूरचा हा ऑफ शोल्डर लेहंग्याचा लूक पारंपारिक व ट्रेंडी होता.

जान्हवीचा हा लेहंगा तरुण ताहिलियानी आर्ट नूव्यू प्रेरित होता आणि ताहिलियानी यांच्या नव्याने लाँच होणाऱ्या ब्रायडल कॉउचर 2024 कलेक्शनमधील लेंहगा होता.