
मुंबईत शुक्रवारी दुपारी धुळीची चादर पसरली होती. यामुळे शहरातील दृश्यमानता कमी झाली. मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनावरही याचा परिणाम झाला. सामान्य जनजवीन विस्कळीत झाले. धुळीच्या वादळाचा शहरातील वाहतूक आणि लोकल ट्रेन सेवांवरही परिणाम झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, पुढील 3-4 तासात मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (फोटो – रुपेश जाधव)