Photo – ‘छावा’चा अल्बम लॉन्च; विकी, रश्मिकाचा आकर्षक लूक

विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘छावा’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. ‘छावा’ प्रदर्शित होण्यापूर्वी मुंबईत ‘छावा’चा अल्बम लॉन्च झाला. अल्बम लॉन्च साठी विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना उपस्थित होते. या सोहळ्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. छावाच्या अल्बम लॉन्चमध्ये रश्मिका मंदान्ना खूपच सुंदर दिसत होती. तिने या सोहळ्यात पारंपरिक पोषाखाने लोकांची मने जिंकली. तिने लॉंग प्लाझो सूट घातला होता आणि केसांच्या पोनीने तिचा लूक पूर्ण केला होता. तसेच विकी कौशलने काळ्या रंगाचा जोधपुरी पोशाख घातला होता. तसेच या क्लासी लूकवर ब्लॅक गॉगलने विकीने आपला लूक पूर्ण केला आहे.