प्रतिक्षा संपली. अखेर गेल्या अनेक दिवसापासून ज्याची वाट पाहतोय तो क्षण आला. आजपासून bigg Boss सुरू होत आहे . सगळ्यांना उत्सुकता आहे ती बिग बॉसच्या घराची. यंदा बिग बॉसचे घर नेहमीपेक्षा हटके करण्यात आले आहे. दरवर्षी मराठमोळा टच असणारे बिग बॉसचे घर यंदा डोळे दिपवणारे आहे. हिंदी बिग बॉसलच मागे टाकेल असे आलिशान घर बनवण्यात आले आहे. यावेळच्या स्पर्धकांना राजेशाही थाट उपभोगता येणार आहे. कारण यावेळी घर सप्नेन्सने भरलेले असणार आहे. घराला मराठमोळा टच नसला तरी मराठमोळे स्पर्धक कल्ला करणार आहेत. यावेळी स्पर्धकांसाठी चक्रव्यूह रचला आहे. त्यामुळे स्पर्धक हा चक्रव्यूहाचा कसा वापर करणार आहेत हे औत्त्सुक्याचे असणार आहे.