हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील राष्ट्रीय स्मारकाचा पहिल्ला टप्पा पूर्ण झाला आहे. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, ”हिंदुहृदयसम्राट यांचं जनतेविषयीचं प्रेम आणि प्रेरणा देणार स्मारक बनणार असून याच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे.” तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले की, “सहा ते आठ महिन्यात बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक पूर्णत्वास नेण्याच्या आमचा प्रयत्न असेल.” या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते सुभाष देसाई हे देखील उपस्थित होते.
(सर्व फोटो – रुपेश जाधव)