Photo – आदित्य ठाकरे यांनी केली वरळी कोळीवाड्यातील मुख्य रस्त्यांच्या कामाची पाहणी

शिवसेना (उद्धव बाळासाबे ठाकरे) युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज वरळी मतदारसंघातील कोळीवाड्यात सुरू असलेल्या मुख्य रस्त्यांच्या कामकाजाची पाहणी केली.

रस्त्यांचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून कित्येक महिन्यांपासून रखडलेले आहे.

ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित आहे.

एसंशि आणि त्यांच्या मलिदा खाणाऱ्या कंत्राटदारांमुळे रस्त्यांचे कामकाज वेळेत पूर्ण होण्याऐवजी आणखीनच रखडत आहे, अशी टीका यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाजप व एसंशी गटावर केली.