स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवसेना भवन येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित सर्वांनी राष्ट्रध्वजाला सलामी देत, मायभूमीच्या रक्षणासाठी लढलेल्या क्रांतिकारी लढ्यांचे स्मरण केले. या सोहळ्यास सौ. रश्मी ठाकरे, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, पदाधिकारी, शिवसैनिक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.