येत्या काळात ईपीएफओमध्ये मोठे बदल होणार आहेत. किमान पेन्शनची मर्यादा तसेच अन्य आकर्षक योजना घेऊन येण्याचा सरकारचा विचार आहे. तसेच ईपीएफओ पोर्टलवरून लग्न, शिक्षणासाठी सहजपणे पीएफची रक्कम काढता यावी, यादृष्टीनेही सुविधा देण्याचा सुरू आहे. सध्या कमीत कमी पेन्शन एक हजार रुपये आहे. ही मर्यादा नव्या बदलांतर्गत वाढवण्यात येऊ शकते. निवृत्तीच्यावेळी पेन्शन फंडमधून आंशिक रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. तसेच ज्यांचे मासिक वेतन 15 हजार रुपये आहे, त्यांच्यासाठी आकर्षक योजना आणण्याचा विचार आहे, असे श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले.