
अटल सेतू तसेच वरळीला जोडणाऱ्या पुलाचा आराखडा सदोष आहे. या प्रकल्पाच्या आड येणारा प्रभादेवीचा पूल तोडू नये, अशी मागणी याचिकेद्वारे मुंबई हायकोर्टात करण्यात आली आहे. याप्रकरणी मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने या प्रकरणी एमएमआरडीएकडे दाद मागण्याचे निर्देश याचिकाकर्त्याला दिले.
अटल सेतू तसेच वरळीला जोडणाऱ्या कनेक्टरमुळे प्रभादेवी येथील ब्रिटिशकालीन पूल तोडण्यात येणार आहे. यामुळे या ठिकाणी वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. कनेक्टर पुलाच्या आराखडय़ात दोष असून वरळी-शिवडी कनेक्टरचा आराखडा तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत शिवाजी पार्क येथील रहिवाशी प्रभंजन कत्रे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.