
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांमध्ये एक महिला असावी यासह विश्वस्त नियुक्ती प्रक्रियेत जिल्हा न्यायाधीशांनी बदल करावा या मागणीसाठी दाखल झालेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. हे बदल करण्याचे अधिकार जिल्हा प्रधान न्यायाधीशांना नाहीत, यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. विश्वस्त नियुक्ती जिल्हा न्यायाधीशांनी अर्ज मागवून करावी. विश्वस्तांच्या शिफारशीनुसार या नियुक्त्या होऊ नयेत, अशी विनंती करणारा दावा आदेश नरके यांनी पुणे जिल्हा न्यायालयात दाखल केला होता. हा दावा जिल्हा न्यायालयाने मान्य केला नाही. नियुक्त्यांमध्ये बदल करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत, असे जिल्हा न्यायाधीशांनी स्पष्ट केले.