
2023 मध्ये बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आयआयटीत प्रवेश मिळण्यासाठी जेईई-अॅडव्हान्स 2025 परीक्षा देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. जेईईसाठी तीन संधी मिळाव्यात या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने पेंद्र सरकारकडून उत्तर मागवले आहे. न्यायमूर्ती बीआर गवई आणि ऑगस्टीन जॉर्ज महीस यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.