अजमेर दर्ग्यात शिवमंदिर; याचिका स्वीकारली

अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यात शिव मंदिर असल्याचा दावा करणारी याचिका अजमेर सिव्हिल कोर्टाने स्वीकारली आहे. आज न्यायालयाने ती सुनावणीस योग्य असल्याचे मान्य केले. हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी ही याचिका केली आहे.