नीट-यूजी परीक्षा रद्द करण्याविरुद्ध याचिका

पेपरफुटीमुळे वादग्रस्त ठरलेली नीट-यूजी परीक्षा रद्द करू नये यासाठी गुजरातमधील 50हून अधिक यशस्वी परीक्षार्थींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याचिकाकर्त्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या अनेकांचा समावेश आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने, पेंद्रीय शिक्षण मंत्रालयाला या वर्षी 5 मे रोजी घेण्यात आलेल्या नीट-यूजी परीक्षेतील पेपरफुटी आणि तोतयेगिरी यांसारख्या अनुचित पद्धतींमध्ये गुंतलेल्या विद्यार्थ्यांची आणि इतरांची चौकशी, ओळख पटवणे आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.