Ratnagiri News- पर्ससीननेट मासेमारी नौकेला आग, सुदैवाने जीवितहानी नाही

रत्नागिरीत नेहमी गजबजलेल्या मिरकरवाडा बंदरात पर्ससीननेट मासेमारी नौकेवरील गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला. त्यामुळे आग लागल्याने मच्छिमारांमध्ये खळबळ उडाली होती. सुमारे 10 मिनिटाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले.

पर्ससीन नेट नौकेला अचानक आग लागल्याने त्या नौकेच्या शेजारी असलेल्या नौकांवरील खलाशांमध्ये खळबळ उडाली.
मिरकरवाडा जेटीला नागरलेल्या सारसी या पर्ससीननेट नौकेला ही आग लागली होती. नौका समुद्रात मासेमारी करून झाल्यानंतर नौका नांगरावर ठेवण्यात आली होती. त्यावेळी अचानक आग लागल्याने खलाशी ती विझवण्यासाठी पाईपने पाण्याचा फवारा मारून आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, आग विझवण्यात येत असताना गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला. त्यामुळे लोकांनी तेथून पाण्यात ढकळला. समुद्राच्या पाण्यात सिलेंडर पडल्याने तरंगत असताना सिलेंडरचा स्फोट होण्याच्या शक्यतेने उपस्थितांमध्ये भिती निर्माण झाल्याने सर्व जण सैरावैरा पळू लागले. सुर्दैवाने गॅस सिलेंडरची आग विझल्याने अनेकांचा जीव बचावला आहे. वेळेत आग विझल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेमध्ये जिवीतहानी झालेली नाही.