महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या लोकसेवेच्या पंचसूत्रीद्वारे जनसामान्यांना न्याय मिळेल : नाना पटोले

महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या लोकसेवेच्या पंचसूत्रीद्वारे जनसामान्यांना न्याय मिळेल. महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने महाविकास आघाडीला साथ देऊन सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावं, असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत.

गडचिरोलीतील वडसा येथे आज काँग्रेस आणि महाविकास आघाडीची विराट सभा काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला, विरोधी पक्षनेते व ब्रह्मपुरी विधानसभा मतदासंघाचे उमेदवार विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. नामदेव किरसान, आरपीआय गटाचे प्रमुख राजेंद्र गवई मंचावर उपस्थित होते. याच सभेत बोलताना ते असं म्हणाले आहेत.

सभेला संबोधित करताना नाना पटोले म्हणाले की, ”प्रियांका गांधी ज्या ठिकाणी जातात त्या भागातील उमेदवार निवडून येतात. त्यामुळे विदर्भाच्या संपूर्ण आदिवासी पट्ट्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील. हा आमचा आदिवासी पट्टा धान उत्पादकांचा पट्टा आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर धान उत्पादक शेतकऱ्यांना 1000 रुपये बोनस देऊन 3300 रूपयांनी धान खरेदी करण्याची महाविकास आघाडीची भूमिका आहे.”