सुट्टीचा हंगाम संपल्यामुळे चाकरमानी आता परतीच्या प्रवासाला लागले असून मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीमुळे महामार्गावर गाडय़ांच्या रांगाच रांगा लागत आहेत. त्यामुळे कडक उन्हातही वाहतूककोंडी प्रवाशांसाठी असह्य होत आहे. वाहतूक कोंडीकडे पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासीवर्गाकडून होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. अशावेळी उन्हाळी सुट्टय़ांचा हंगाम संपल्यानंतर चाकरमानी पुन्हा मुंबईकडे परतू लागले आहेत. कोकण रेल्वेच्या गाडय़ा फुल्ल असल्यामुळे चाकरमानी खासगी वाहनाने प्रवास करणे पसंत करतात. मात्र त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. चिपळूण ते हातखंबादरम्यान अनेक ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळेही वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूककाsंडी होत आहे. तसेच अवजड वाहने रस्त्यात आल्यावरही वाहतूककोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे.
सध्या कडक उन्हाळा सुरू असताना वाहतूककोंडीमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. सुट्टय़ा असल्यामुळे कोकणात येणाऱया खासगी ट्रव्हल्सचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे रस्त्यावरची रहदारी वाढून वाहतूककोंडी होत आहे. वाहतूककाsंडी सोडविण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी प्रवासी करत आहेत.
रत्नागिरी ते मुंबई खासगी बस तिकीट 1500 रुपये
चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. कोकण रेल्वेच्या सर्व गाडय़ांची आरक्षणे फुल्ल झाली आहेत. अशावेळी खासगी बस हा एकमेव पर्याय चाकरमान्यांसमोर उभा राहतो. खासगी बसवाल्यांनीही लूटमार सुरू केली आहे. रत्नागिरी ते मुंबई स्लीपर गाडीचे तिकीट चक्क 1500 रुपये आहे. नॉन-एसी चेअरचे तिकीट चक्क 900 रुपये आहे. या अवाचेसवा तिकीट दराकडे प्रादेशिक परिवहन विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी प्रवासी करत आहेत.