
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी बहुतेक पर्यटक होते. या क्रूर हल्ल्याच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीयांकडून कश्मीर बंद पाळण्यात आला. पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती आणि मिरवाईज उमर फारूख यांनी बंदची हाक दिली होती.
जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (जेकेएनसी) आणि इतर राजकीय पक्षांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे. जेकेएनसीने नागरिकांना बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले होते. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज श्रीनगरमध्ये पीडीपी मुख्यालयाजवळील शेर-ए-काश्मीर पार्क येथून मोर्चा देखील काढण्यात आला.
दरम्यान, पहलगाम हल्ल्याने कश्मीरमधील पर्यटन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. स्थानिक टॅक्सी चालक आणि नागरिकांनी हल्ल्याच्या निषेधार्थ कँडल मार्च काढला. अनेक ठिकाणी शांततापूर्ण निषेध व्यक्त करण्यात आला.
Pahalgam Attack Video – हिंदुस्थानी जवानांना पाहून घाबरले पर्यटक, नेमकं काय घडलं?