PSL ला डावलून IPL ला प्राधान्य दिल्याने PCB चा जळफळाट, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूवर घातली 1 वर्षांची बंदी

पाकिस्तान सुपर लिगमधील बाबर आझमच्या पेशावर झल्मी संघाला स्पर्धा सुरू होण्याच्या आगोदरच तगडा झटका बसला. दक्षिण आफ्रिकेचा स्टार ऑलराऊंडर कॉर्बिन बॉशने IPL मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी PSL ला रामराम ठोकला होता. त्यामुळे पीसीबीने कॉर्बिनवर एक वर्षांची बंदी घातली आहे. पाकिस्तान सुपर लिगला आजपासून (11 एप्रिल 2025) सुरुवात होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लिजाड विल्यम्स दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर झाला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सने कॉर्बिन बॉशची रिप्लेसमेंट म्हणून 75 लाख रुपयांना संघात निवड केली होती. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बॉशवर कारवाई केली असून त्याच्यावर एक वर्षांची बंदी घातली आहे. त्यानंतर बॉशने संघाची, चाहत्यांची आणि पीसीबीची माफी मागितली आहे. तसेच पीसीबीने केलेल्या बंदीच्या निर्णयाचा सुद्धा त्याने स्वीकार केला आहे. कॉर्बिनने पाकिस्तान सुपर लीगच्या ड्राफ्टमध्ये आपल्या नावाची नोंद केली होती. त्यानंतर ड्राफ्टमधून पेशावर झल्मी संघाने कॉर्बिनला आपल्या ताफ्यात सामिल करून घेतले होते.