पेटीएम अ‍ॅपमध्ये गुंतवणुकीची रिअल टाइम माहिती मिळणार

फिनटेक कंपनी पेटीएम अ‍ॅपमध्ये आता गुंतवणुकीची रिअल टाइम माहिती मिळणार आहे. वापरकर्ते एआयच्या मदतीने याचा शोध घेऊ शकतील. पेटीएमने एआय स्टार्टअप पर्प्लेक्सिटीसोबत कराराची घोषणा केली आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना पेटीएम अ‍ॅपवर एआय इंटिग्रेटेड सर्च पर्याय मिळेल. या माध्यमातून वापरकर्त्यांना त्यांच्या स्थानिक भाषेत रिअल टाइम माहिती आणि आर्थिक लेखाजोगा पाहता येईल.