निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्याचे वांदे झाले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काम केलेल्या पर्वती आणि शिवाजीनगरमधील निवडणूक कर्मचाऱ्यांना त्यांच्या भत्त्याचे पैसे अद्यापही मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्यावेळी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचीदेखील बदली झाली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या भत्त्याचे काय होणार याची चर्चा सध्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या चार मतदारसंघांसाठी आठ हजार 417 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. त्यासाठी सुमारे 39 हजार 422 इतके अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता 21 विधानसभा मतदारसंघासाठी कर्मचाऱ्यांच्या नेमणूक करण्यात आल्या आहेत. अनेक कर्मचाऱ्यांच्या निवडणुकीच्या कामाचे दुसरे प्रशिक्षण घेण्यात येत आहे, तरीही लोकसभा निवडणुकीसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांपैकी पर्वती, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात काम केलेल्या त्यावेळीच देण्यात आले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील कर्मचाऱ्यांना दोन कोटी 70 लाख, तर पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील तीन तालुक्यांतील कर्मचाऱ्यांसाठी 6 कोटी 62 लाख रुपयांचा निधी सुपूर्द करण्यात आला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील पैसे अद्याप मिळाले नाहीत कर्मचाऱ्यांना अद्याप भत्ता मिळालेला नाही.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे मानधन त्यांच्या संबंधित विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार कोणत्याही कर्मचाऱ्यांचे मानधन राहिले नाही. पर्वती, शिवाजीनगर मतदारसंघातील त्या वेळी कर्मचाऱ्यांचे मानधन दिले की नाही, याची चौकशी करू. अनेक कर्मचाऱ्यांनी बँकेच्या त्यांच्या खात्याची चुकीची माहिती दिली असल्याने त्यांच्या रकमा परत आल्या आहेत.