पायल तडवी आत्महत्या प्रकरण; नायर रुग्णालयाच्या माजी प्रसूती विभागप्रमुखांना कोर्टात अनुपस्थित राहण्यास मुभा

पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपी नायर रुग्णालयातील स्त्री रोग आणि प्रसूती विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ. चिंग लिंग यी यांना आरोपी करण्यात आले आहे. मात्र डॉ. चिंग यांनी याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. डॉ. चिंग यांना सत्र न्यायालयात सुनावणीला अनुपस्थित राहण्याची मुभा मागितल्यास आक्षेप घेणार नाही, अशी माहिती खंडपीठाला देण्यात आली.

पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात संबंधित डॉक्टरांविरोधात 23 मे 2019 रोजी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. असे असतानाही डॉ. चिंग यांना चौथे आरोपी करण्याचे आदेश विशेष सत्र न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सत्र न्यायालयाच्या या निकालाला डॉ. चिंग यांनी अॅड. आशीष चव्हाण यांच्यामार्फत आव्हान दिले आहे. या याचिकेवर आज सोमवारी न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांच्या एकलपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी न्यायालयाने या याचिकेवर 25 एप्रिल रोजी सुनावणी  ठेवली.

z विशेष न्यायालयाने जुलै 2019मध्ये या गुह्याची दखल घेतली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आरोप निश्चित करण्यासाठी युक्तिवाद सुरू असतानाच फिर्यादीने डॉ. चिंग यांना चौथा आरोपी म्हणून एफआयआरमध्ये नोंद करण्याची मागणी केली. मात्र फिर्यादीने हा विलंबाने केलेला प्रयत्न असून डॉ. चिंग यांच्याविरोधात कोणताही पुरावा नसल्याचे याचिकेत म्हटले आहे.