डॉ. पायल तडवी प्रकरण – विशेष सरकारी वकील घरतांची नियुक्ती तडकाफडकी रद्द

डॉ. पायल तडवी आत्महत्या खटल्यातील विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांची नियुक्ती तडकाफडकी रद्द करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर अ‍ॅड. महेश मुळ्ये यांची नियुक्ती केली आहे.

महत्त्वाचे म्हणजे नियुक्ती रद्द केल्याची माहिती अ‍ॅड. प्रदीप घरत यांना दिली गेलेली नाही, मात्र अ‍ॅड. महेश मुळ्ये यांच्या नियुक्तीचे पत्र विधी व न्याय विभागाने जारी केले आहे. या निर्णयावर अ‍ॅड. घरत यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात नायर रुग्णालयातील स्रीरोग विभागाच्या माजी प्रमुख डॉ. चिंग लिंग चुंग चियांग यांना आरोपी करण्यासाठी मी अर्ज केला. विशेष न्यायालयाने डॉ. चियांग यांना आरोपी करण्यासाठी परवानगी दिली. त्याचा राग ठेवून माझी नियुक्ती रद्द करण्यात आल्याचा आरोप अ‍ॅड. घरत यांनी केला आहे. डॉ. पायलने डॉ. चियांग यांच्याकडे मानसिक छळाची तक्रार केली होती. त्यावर डॉ. चियांगने काहीच कारवाई केली नाही, असा आरोप आहे.