विमानतळावर ऑनलाइन भरा पार्किंग शुल्क; ऑटोमेटिक डिजिटल पेमेंट यंत्रणा सुरू  

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने पूर्णपणे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या दिशेने पाऊल उचलले आहे. पार्किंगसाठी ऑटोमॅटीक डिजिटल पेमेंट प्रणाली सुरू करण्यात आली आहे. विमानतळावरचे प्रवासी मल्टिलेवल कार पार्किंगमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी नवी डिजिटल प्रणाली वापरू शकतात.

प्रवाशांना यूपीआय, डिजिटल वॉलेट्स, डेबिट/क्रेडिट कार्ड्स किंवा फास्टॅग-आधारित ऑटोमॅटिक डिडक्शन्सच्या माध्यमातून सहजपणे पार्किंग फीस भरण्याची सुविधा मिळावी म्हणून मुंबई एअरपोर्टकडून कॅशलेस डिजिटल पेमेंट सिस्टम नुकतीच लाँच करण्यात आली.   सध्या मुंबई विमानतळावर मल्टिलेवल कार पार्किंगमध्ये 66 टक्के युजर्स त्यांचे पेमेंट करण्यासाठी प्रायमरी मोड म्हणून फास्टॅगचा वापर करतात. तर  10-15 टक्के युजर्स यूपीआय, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड पर्यायांचा वापर करतात़  5 टक्के प्री-बुकिंग पार्किंग स्लॉट्स आहेत. याचा अर्थ सद्यस्थितीत 85 टक्के प्रवासी कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे उर्वरित ग्राहकांनाही ऑटोमेटेड डिजिटल पेमेंट पद्धती स्वीकारण्यास प्रेरित करून कॅश पेमेंटचा वापर आणखी कमी करण्याचा विमानतळ प्रशासनाचा प्रयत्न आहे, मात्र कॅश पेमेंट देण्याचा पर्याय निवडणाऱ्या प्रवाशांना फक्त ठरावीक पेमेंट स्टेशनवर पेमेंट करता येईल.