
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण पाच दिवसांपूर्वी प्रयागराजमध्ये सुरू असणाऱ्या महाकुंभमेळ्यात कुटुंबासह गेले होते. त्यावेळी त्यांनी गंगेत डुबकीही मारली होती. मात्र, यानंतर आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हैदराबाद येथील अपोलो रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. पवन कल्याण यांची संगमावरील डुबकी आणि त्यांचे आजारपण यांचा काही संबंध आहे का, अशी चर्चा सोशल मिडीयावर होत आहे.
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी पाच दिवसांपूर्वी महाकुंभाला भेट दिली आणि संगमात डुबकी मारली. आता त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते नियमीत तपासण्यांसाठी दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, या घटनेचा संगमातील नदीचे पाणी आणि दर्जा याबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नदीचे प्रदूषण वाढले असून त्यात बॅक्टेरियाचे प्रमाण सर्वाधिक आहे, असे आढळून आले होते. तसेच याबाबत उत्तर प्रदेश सरकारने याआधीचे नमुन्यांवरून हरीत लवादाला अहवाल सादर केला होता. त्यामुळे हरीत लवादाने योगी सरकारला चांगलेच सुनावले होते. तरीही संगमावरील पाणी आंधोळीसाठी आणि पिण्यासाठी योग्य असल्याचा दावा योगी सरकारकडून करण्यात येत आहे. यावर आता सोशल मिडीयावरही संताप व्यक्त होत आहे.
योगी सरकारने पाण्याचा दर्जा आणि नदीतील पाण्याच्या प्रदूषणाबाबतची योग्य माहिती जनतेला द्यावी. नदीतील पाण्याच्या गुणवत्तेशी संबंधित अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जर त्यात तथ्य असेल तर योगी सरकारने ते लपवू नये. सार्वजनिक सुरक्षेसाठी आणि जनतेच्या हितासाठी योगी सरकारने खरी माहिती द्यावी अशी मागणी होत आहे. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी संगमात स्नान केल्यानंतर पाच दिवसातच त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा अकदा ऐरणीवर आला आहे.