आजारपणाला कंटाळून रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना आज विक्रोळी येथील क्रांती ज्योती महात्मा फुले रुग्णालयात घडली. गौरव भोसले असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
गौरव हा विक्रोळीच्या कन्नमवार नगर येथे राहत होता. चार दिवसापूर्वी त्याला विक्रोळीच्या क्रांतीज्योती महात्मा फुले रुग्णालयात दाखल केले होते. गौरवला दारूचे प्रचंड व्यसन होते. जर दारू जास्त प्रमाणात न मिळाल्यास तो नैराश्यात जात असायचा.