17 जानेवारीला येतोय ‘पाताललोक-2’

लॉकडाऊनमध्ये गाजलेल्या ‘पाताललोक’ या वेब सीरिजचा दुसरा भाग येत्या 17 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पाताललोकच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. आता पाताललोकचा दुसरा भाग येत आहे. नव्या वर्षात दरवाजे उघडणार… अशी टॅगलाइन देत पाताललोक-2 च्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या भागातील जयदीप अहलावत हा प्रमुख भूमिकेत आहे.