बेस्टच्या प्रतीक्षानगर आगारात एका गर्भवती महिला कर्मचाऱ्याने हलक्या स्वरुपाचे काम देण्याची विनंती केल्यानंतर अधिकाऱ्याने तिच्याशी असभ्य भाषेत संभाषण केले. त्यामुळे एका संघटनेसह संबंधित महिलेने सदर अधिकाऱ्याला मारहाण केली. या पार्श्वभूमीवर भाडेतत्त्का वरील कर्मचाऱ्यांनी आज प्रतीक्षानगर आणि धारावी आगारामध्ये अधिकाऱ्यांच्या मुजोरीकिरोधात काम बंद आंदोलन केले. त्यामुळे सकाळीच कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाल्याची माहिती बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी दिली.
‘बेस्ट’च्या प्रतीक्षानगर डेपोमध्ये कंडक्टर पदावर असणारी ही महिला गर्भवती असल्याने तिने आपल्याला हलक्या स्वरुपाचे काम द्यावे अशी मागणी संबंधित आगारातील अधिकाऱ्याकडे केली. मात्र संबंधित अधिकाऱ्याने महिलेशी अपमानजनकरीत्या संकाद साधला. याबाबत संबंधित महिलेने आपल्याकर झालेल्या अन्यायाचा एक क्हिडीओही सोशल मीडियात शेअर केला. यामध्ये संबंधित अधिकाऱ्याने वारंवार किनंती पत्र देऊनही कोणतीही कार्यकाही केली नसल्याचे महिलेने म्हटले आहे. दरम्यान, केट लिजच्या गाडय़ांकरील कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही मागण्या मान्य होत नसून त्यांना नाहक त्रास दिला जात असल्याचे बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी म्हटले आहे. त्यामुळे केटलीज पूर्णपणे बंद करून बेस्टले आपल्या गाडय़ांचा ताफा चार हजारपर्यंत काढकाका अशी मागणीही त्यांनी केली आहे.