या वर्षीच्या गेल्या 11 महिन्यांत राज्यात विविध ठिकाणी एसटी बसचे जवळपास 2286 अपघात झाले. त्यात 201 जणांचा मृत्यू झाला असून 3034 जण जखमी झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे एसटीचे अपघात टाळण्यासाठी परिवहन मंडळाकडून विशेष प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
या वर्षी राज्यात विविध ठिकाणी एसटी बसेसच्या अपघातांची नोंद झाली. प्राणांकित अपघातात 201 जणांना आपला जीव गमवावा लागला. यात 21 प्रवासी आणि आठ राज्य परिवहन कर्मचाऱयांचा समावेश आहे. तर 57 अन्य लोक असल्याची नोंद आहे. याशिवाय 995 गंभीर स्वरूपाचे, तर एक हजार 46 किरकोळ अपघात नोंदवले गेलेत. त्यामध्ये एसटी बसने प्रवास करणारे दोन हजार 70 प्रवासी, 185 एसटी कर्मचारी, 106 पादचारी आणि 673 अन्य लोकांचा समावेश आहे. एसटी बसचा प्रवास हा सुरक्षित प्रवास मानला जातो. त्यामुळे प्रवासी एसटी बसेसला सर्वाधिक पसंती देतात. त्यामुळे एसटी बसेसचे अपघात होऊ नये याकरिता महामंडळाकडून विशेष प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.