ट्रेनमध्ये जेवणावरून होणारे वाद काही नवीन नाहीत. रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये अनेकदा भांडणे होतात. मात्र यावेळी जरा वेगळंच घडलंय. कारण रेल्वे कर्मचाऱयाच्या पाठीशी खुद्द प्रवासी उभे राहिल्याचे दिसून येतंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
झालं असं की, एका वृद्धाने ‘वंदे भारत’ ट्रेनने प्रवास करताना जेवण ऑर्डर केले होते. त्याने शाकाहारी जेवणाची ऑर्डर दिली होती. पण वेटरने चुकून मांसाहारी जेवण आणून दिले. त्यामुळे तो वृद्ध भडकला आणि त्याने रागाच्या भरात त्या वेटरला दोन सणसणीत थोबाडीत मारल्या. वेटर माफी मागून शाकाहारी जेवण आणून देतो असे म्हणत होता. पण चूक मान्य केल्यानंतरही ती वृद्ध व्यक्ती ऐकायला तयार होईना. उलट वृद्धाने अपशब्द उच्चारून मारहाणीला सुरुवात केली.
तुम्ही गरीब माणसाला कसे मारता, असा सवाल अन्य प्रवाशांनी केला. अखेर बाजूचे प्रवाशी त्या वेटरच्या मदतीला धावले. डब्यातली जवळपास सर्वच लोपं आपल्या विरोधात उभी आहेत हे लक्षात आल्यानंतर तो वृद्ध प्रवासी घाबरला आणि त्याने वेटरची माफी मागितली.
– रेल्वेमध्ये वेटरला मारहाण केल्याचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. नेटिजन्स वेटरची बाजू घेताना दिसत आहेत.