मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ एलिफंटा येथे जाणारी नीलकमल ही प्रवासी बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बोटीमधून 101 जणांना वाचवण्यात आले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच दोन प्रवाशांचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला आहे.
गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटा येथे जाणारी नीलकमल या प्रवासी बोटीला नौदलाची बोट येऊन धडकली आणि त्यामुळे उरण, कारंजा येथे बोट बुडाली. सदर ठिकाणी नौदल, JNPT, Coast Guard, यलोगेट पोलीस ठाण्याच्या 3 आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत व बचाव कार्य सुरू होते. प्रवासी आणि नौदलाची कर्मचारी असे एकून 110 जणांना वाचवण्यात यश आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. JNPT रुग्णालयात 56, नेवी डॉकयार्डमध्ये 32, अश्विनी रुग्णालयात 1, ST जिऑर्जमध्ये 9 आणि कारंजे येथे 12 अशा एकून 110 प्रवाशांवर उपचार सुरू आहेत. यापैकी 104 प्रवाशांचा प्रकृती स्थिर असून 4 जणांचा प्रकृती गंभीर आहे. तसेच दोघांचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला आहे.
गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोट उलटली, प्रवाशांना वाचवण्यासाठी नौदल, JNPT, तटरक्षक दलाचे प्रयत्न#mumbai pic.twitter.com/O9xFEzTlrT
— Saamana Online (@SaamanaOnline) December 18, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, सदर बोट ही राजा परते यांच्या नावावर आहे. बोट गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटा येथे जात होते. दुपारी 3.55 च्या दरम्यान नौदलाची स्पीड बोट वेगाने नीलकमल बोटला धडकली आणि मोठा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच नौदलाच्या 4, JNPT, Coast guard चे Dy. Commandant जलाल वत्स, यलोगेट पोलीस ठाण्याच्या चैत्राली, इंद्रायणी आणि पंचगंगा नावाच्या 3 आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत व बचाव कार्य चालू केले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यलोगेट पोलीस ठाणे हे घटनास्थळी हजर होते.