पर्यावरण दक्षता मंडळ ही सामाजिक संस्था ‘पर्यावरण शिक्षण, संशोधन आणि जनसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे’ या ध्येयाने महाराष्ट्रात काम करत आहे.
पर्यावरण दक्षता मंडळाची स्थापना 9 जुलै 1999 मध्ये डॉ. विकास हाजीरनीस, विद्याधर वालावलकर, डॉ. संजय जोशी आणि इतर काही समविचारी मित्रमंडळींनी एकत्रितपणे येऊन केली.
‘पर्यावरण शाळा’ हा संस्थेचा एक महत्त्वाचा उपक्रम असून या उपक्रमांतर्गत संस्था शाळा, महाविद्यालये तसेच सोसायटय़ांमध्ये पर्यावरण शिक्षण देते. संस्थेतर्फे पर्यावरणपूरक जीवनशैली कशी अवलंबवावी याबरोबरच कचरा-पाणी व्यवस्थापन, पावसाचे पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जा संसाधन व्यवस्थापन, रोपवाटिका व्यवस्थापन, लॅण्डस्केपिंग आणि आरोग्य व्यवस्थापन यांसारख्या विषयांवर स्थानिक लोकांना प्रारंभिक मोफत सल्ला दिला जातो.
संस्था 2004 पासून पर्यावरणाविषयक माहिती देणारे ‘आपलं पर्यावरण’ हे मासिक चालवते. शिक्षणाच्या प्रक्रियेत हे मासिक विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना मोलाची मदत करत आहे. संस्थेच्या सचिव संगीता जोशी म्हणाल्या, ‘‘या संस्थेशी जोडली गेल्यावर खऱया अर्थाने मला पर्यावरण या विषयाची व्याप्ती कळली. फक्त झाडे लावणे, वाढवणे म्हणजे पर्यावरण नाही, तर पर्यावरणाशी सगळय़ाच गोष्टी निगडित आहेत. आमची संस्था पर्यावरणासाङ्गी कार्य करणारी एक मजबूत आणि स्वयंपूर्ण संस्था आहे.’’
कल्याण-मुरबाड मार्गावर संस्थेचा ‘निसर्गायण’ हा आगळावेगळा प्रकल्प असून यात पर्यावरणाचे दुर्मीळ असे विविध कार्यरत नमुने/प्रतिकृत्या (वार्ंकग मॉडेल्स) पाहायला मिळतात. अनेक शाळांच्या सहली तसेच क्षेत्र भेटी या प्रकल्पाला दिल्या जातात. 2017 पासून संस्थेचा टिटवाळा येथील रुंदे या गावात वन खात्याच्या सहकार्याने ‘देवराई वनीकरण प्रकल्प’ सुरू आहे. ओसाड जमिनीवर जंगल तयार करून ते वन खात्याच्या सुपूर्द करणे असा हा प्रकल्प असल्याचे जोशी यांनी सांगितले.
या क्षेत्रात आहे संधी
वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरण व्यवस्थापनातील संधी वाढत आहेत. इच्छुकांना पर्यावरण क्षेत्रात उपलब्ध असलेल्या विविध संधींची ओळख करून देण्यासाङ्गी कार्यशाळा/अभ्यासक्रम आयोजित केले जातात. त्यांना या क्षेत्रात करीअर करण्यासाङ्गी मार्गदर्शन केले जाते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्रे दिली जातात. संवेदनशील पर्यावरणप्रेमींसाङ्गी अभ्यासक्रमाची श्रेणी एक दिवस ते दहा दिवसांपर्यंत आहे. भटपंती, ग्रीन लव्हर्स क्लब, पालवी, जनसाक्षरता, ग्रीन शॉपी इत्यादी प्रेरणादायी उपक्रम संस्था राबवते.