
परतूर तालुक्यातील 542 शिक्षकांचा थकीत आयकराची भरण्याची मुदत संपली तरीही भ्रष्ट गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे व शालार्थ समन्वयक चंद्रकांत पौळ यांनी 1 कोटी 34 लाख 45 हजार 438 रुपये परस्पर उचलून अपहार केल्याचे उघड झाले आहे. घटसाधन केंद्राच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे 542 शिक्षकांना फटका बसणार आहे. ‘दैनिक सामना’च्या पाठपुराव्यामुळे शेताचे कुंपण खाणारे उघडकीस आलेले आहेत.
पगारातून दरमहा आयकर कपात करून गटसाधन केंद्राचे गटशिक्षणाधिकारी याच्या खात्यावर जमा करत असतात. गटशिक्षणाधिकारी यांनी सदरील आयकर हा त्यांच्याकडे जमा झाल्यापासून सात दिवस किंवा दर तीन महिन्याला तो चलनाद्वारे आयकर विभागाकडे वर्ग करणे बनधनकारक आहे. मार्च 2025 अखेर गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे यांनी लेखी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील आयकर पात्र 542 शिक्षकांची दरमहा 23 लाख रुपये रक्कम जमा होत होती.
आजपर्यंत 7 महिन्याचा आयकर भरला आहे. अजून 5 महिन्याचा 1 कोटी 34 लाख 45 हजार रुपये आयकर भरणे बाकी आहे. अशी प्रत्यक्ष कबुली दिली. यामध्ये साबळे यांनी या खात्यामधून २५ लाख रुपये चेकने काढलेले असून शालार्थ समन्वयक चंद्रकांत पौळ यांनी ऑनलाइन 1 कोटी 9 लाख, 45 हजार 338 रुपये स्वतःच्या खात्यावर वर्ग करून अपहार केल्याचे बँक स्टेटमेंट नुसार सिद्ध झाले आहे.
या बँक स्टेटमेंट नुसार गट शिक्षणाधिकारी वर्ग-1 साबळे यांनी शालार्थ समन्वयक चंद्रकांत पौळ याना मासिक वेतनातून कपात करण्यात आलेल्या सन 2024-25 मधील भरणा पौळ याना वारंवार सूचना देऊनही शिक्षकांच्या आयकर कपाती सबंधिताच्या पॅनवर भरणा केला नाही.
सदरील बाब गंभीर स्वरुपाची असल्याने संदर्भीय पत्र क्रं (1) नुसार माहे मार्च 1 एप्रिल 2024 ते 29 मार्च 2025 पर्यंत बँक स्टेटमेंटचे अवलोकन केले असता गट शिक्षणाधिकारी पं. स. परतुर यांचे खाते क्र (52165451700) या खात्यातुन पौळ यांनी 1 कोटी 32 लाख रक्कम स्वतःच्या खात्यावर वर्ग केलेल्या आहेत. यामुळे खुलासा पत्र पाठवले असल्याचे पौळ व वरिष्ठांना कळविल्याचे सांगितले.