पारशी कुटुंबाचा बाप्पा, छोई कुटुंबीय दोन दशकांपासून साजरा करतेय उत्सव

केवळ हिंदूच नाही तर सर्वधर्मीय बाप्पाची मनोभावे पूजा करतात. मूळचे पारशी असलेल्या भायखळा येथील देलनाझ छोई यांच्या घरी गेल्या दोन दशकांपासून गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो. बाप्पावर आमची नितांत श्रद्धा असून तो आमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो, असे छोई कुटुंबीय सांगतात.

प्रभाग क्रमांक 210 मधील रुस्तम बाग पारसी वसाहतीत राहणाऱ्या देलनाई छोई यांच्या घरी दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. बाप्पासाठी दरवर्षी आकर्षक देखावे उभारण्यात येतात. पारशी कुटुंबीयांचा हा बाप्पा पाहण्यासाठी दरवर्षी भाविकांची गर्दी होते.

नुकतीच शिवसेना उपनेते, माजी नगरसेवक मनोज जामसुतकर, भायखळा उपविभाग संघटक आणि माजी नगरसेविका सोनम जामसुतकर यांनी छोई कुटुंबीयांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी उपशाखाप्रमुख रॉनी बुगवाडियादेखील उपस्थित होते.