इटलीच्या संसदेत फ्रीस्टाइल; सत्ताधारी-विरोधकांत जोरदार हाणामारी

इटलीच्या संसेदतील काही खासदारांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. इटलीत सध्या जी-7 शिखर परिषद सुरू आहे. त्यामुळे जगभरातील मोठय़ा देशाचे प्रमुख इटलीत दाखल झाले आहेत. अशा वेळी हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने विविध चर्चांनाही उधाण आहे.

इटलीतील काही प्रदेशांना अधिक स्वायत्तता देण्याच्या मुद्दय़ावरून  संसदेत राडा झाला. या प्रदेशांना अशाप्रकारे स्वायत्तता दिल्यास उत्तर-दक्षिण अशी प्रादेशिक दरी निर्माण होईल आणि दक्षिणी प्रदेशांतील गरिबीत वाढ होईल, असा दावा इटलीच्या संसदेतील विरोधी पक्षांनी केला आहे.

 व्हिडीओत असे दिसतेय की, इटलीच्या सरकारने संसदेत यासंदर्भात प्रस्ताव मांडल्यानंतर विरोधी पक्षनेते लियोनार्डो डोनो यांनी मंत्री रॉबर्टो पैल्डेरोली यांनी इटलीचा  झेंडा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, रॉबर्टो पैल्डेरोली तो स्वीकारण्यास नकार दिला. त्यावेळी अचानक विरोधी पक्षातील सदस्यांनी रॉबर्टो पैल्डेरोली यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लगेच सत्ताधारी पक्षातील काही सदस्यही त्या ठिकाणी दाखल आले. त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली