छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्मलो याचा मला सार्थ अभिमान! स्वप्नील कुसाळेचा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याचा निर्धार

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून रातोरात स्टार झालेला हिंदुस्थानचा मराठमोळा नेमबाज स्वप्नील कुसाळे गुरुवारी मायदेशात परतला. देशासाठी 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये पदक जिंपून तब्बल 72 वर्षांनंतर महाराष्ट्राचा वैयक्तिक ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ त्याने संपविला. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्मलो याचा मला सार्थ अभिमान आहे. ऑलिम्पिक कांस्यपदक जिंपून मी आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं; पण आता मला ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंपून माझं स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचंय,’ असा निर्धार स्वप्नीलने कर्मभूमीत पाऊल ठेवताच व्यक्त केला.

बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संपुलातील ज्या शूटिंग रेजच्या अंगाखांद्यावर खेळत स्वप्नीलने नेमबाजीचे धडे आत्मसात केले, त्या नेमबाजी स्टेडियममध्ये आज (दि. 8) स्वप्नील कुसाळेचा सत्कार करण्यात आला. यावेळी उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, ऑलिम्पिक ज्युरी पवन सिंह, स्वप्नीलच्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे, आई अनिता कुसाळे, वडील सुनील कुसाळे, अक्षय अष्टपुत्रे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती, शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी देत यावेळी दीपाली देशपांडे व चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्वप्नीलचा गौरव करण्यात आला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)