>> द्वारकानाथ संझगिरी
कुठलीही मोठी स्पर्धा सुरू झाली की, हरयाणा हा प्रदेश देशाची क्रीडा राजधानी होतो. देशाच्या लोकसंख्येच्या फक्त दोन टक्के लोकसंख्या हरयाणाची आहे; पण पदक मिळवून देण्याच्या बाबतीत हा प्रदेश अग्रेसर असतो. मग ते एशियन गेम्स असो कॉमनवेल्थ गेम, वर्ल्ड चॅम्पियनशिप किंवा ऑलिम्पिक.
2024च्या पॅरिस ऑलिम्पिकच्या पदकांचा श्रीगणेशा हा हरयाणानेच दोन पदकं जिंकून केला. प्रामाणिकपणे सांगायचं तर, एकेकाळी हरयाणाच्या क्रीडा संस्कृतीशी माझी ओळख कपिल देवपासून झाली. ते माझं अज्ञान होतं किंवा क्रिकेटवरचं अतिरेकी प्रेम. त्यामुळे इतर खेळांकडे दुर्लक्ष व्हायचं. पण, तरी एक गोष्ट सांगितलीच पाहिजे की, आज जे हिंदुस्थानी क्रिकेट संघात अनेक गोलंदाज दिसतात त्याची सुरुवात कपिल देवपासूनच झाली. कपिल देव हे त्यांचं स्फूर्तिस्थान होतं. पुढे जसजशी इतर खेळांची ओळख झाली, तसं तसं लक्षात आलं की, वेगवेगळय़ा खेळांतील असे अनेक कपिल देव या मातीत जन्माला आले आहेत.
आता त्यांचा अॅथलेटिक्समधला नवीन कपिल देव म्हणजे नीरज चोप्रा. त्याने देशाला पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून दिलं. मनू भाकरने पॅरिसमध्ये अजूनपर्यंत नेमबाजीत दोन कांस्यपदके जिंकून महिलांचेही पाऊल वेगात पुढे पडतंय हे दाखवलं. हरयाणाच्या क्रीडा संस्पृतीचे यश हे त्यांची हरियाणवी संस्कृती, परंपरा, तिथे उगवणारं धान्य, दूध, तूप याबरोबरच सरकारचा प्रामाणिक प्रयत्नसुद्धा कारणीभूत आहे. गेली कित्येक वर्षे खेळ करीअर म्हणून स्वीकारावा, असं तिथल्या मुलामुलींना वाटतं. विशेषतः मुलींच्या आईवडिलांनासुद्धा त्याच महत्त्वाकांक्षा असतात ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांनी मुलींना सर्वसाधारण स्त्री परंपरेच्या चौकटीबाहेर नेलेलं आहे. मुलगी पुस्ती खेळते किंवा मुष्टियुद्ध करते हा विचार माझ्या लहानपणी हास्यास्पद ठरला असता. त्या मुलीच्या आईवडिलांना वेडे ठरवलं गेलं असतं. हरयाणाने ही जुनी समजूत फेपून दिली. आणि म्हणूनच हरयाणातल्या मुली कोषाबाहेर पडल्या.
मूलतः हरयाणाची मुलं आणि मुली शारीरिकदृष्टय़ा सशक्त असतात आणि लहानपणापासून फिटनेस आणि खेळातील प्रावीण्य हे त्यांचं ध्येय असतं. सरकारी स्तरावर त्यांना आर्थिक मदत मिळते. नोकऱयांमध्ये राखीव जागा मिळतात. खेळात जी मुलं प्रावीण्य मिळवतात, त्यांना क्रीडा कोटय़ातून कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो आणि त्यांनी खेळाकडे करीअर म्हणून पाहिले पाहिजे याचा गंभीरपणे पाठपुरावा केला जातो. त्यांना खेळाच्या जिवावर नोकरी मिळत असल्यामुळे आर्थिक स्थैर्यसुद्धा लाभतं. आणि खेळ करीअर म्हणून स्वीकारताना द्विधा मनःस्थिती होत नाही. बरेच खेळाडू पोलीस पर्ह्समध्ये दिसतील. तिथे त्यांना प्रमोशनसुद्धा लवकर मिळतात.
आजच्या हरयाणाच्या खेळाडूंसमोर अनेक आयकॉन आहेत. त्यांच्या यशाच्या कथा आहेत. दारासिंग, योगेश्वर दत्त, गीता पह्गट, बबिता पुमारी, साक्षी मलिक आणि नीरज चोप्रा हे त्यांचे हीरो आहेत. त्यांचा आदर्श मुलं डोळय़ासमोर ठेवतात. आता यापुढे त्या यादीत मनू भाकरसुद्धा जाऊन बसेल. सरकार पदक जिंकल्यानंतर कोटी कोटीचे बक्षीस देते. त्यामुळे त्यांच्या पुटुंबाला चांगलं आर्थिक स्थैर्यसुद्धा लाभतं. तिथे अनेक अकॅडमी आणि प्रशिक्षण पेंद्रे आहेत. हरयाणा सरकारने ती उभी केली आहेत आणि तिथे अद्ययावत प्रशिक्षण दिले जाते. कुस्ती, कबड्डी, मुष्टियुद्ध यावर अधिक लक्ष दिले जाते. फुटबॉलची सुपर लीग, कबड्डी लीग यातून खेळाडूंना चांगलीच कमाई होते. पुठलंही हरयाणा सरकार हे माझं लाडकं सरकार नाही. ते कुणाचेही असेल. उद्या बदलेल; पण खेळाची संस्कृती त्यांनी उभारली. त्याचं कौतुक व्हायलाच हवं. एपंदरीत हरयाणाचे खेळाडू हे आकाशातून पडलेले नाहीत. ते तिथेच जन्मले. तिथेच वाढले. तिथेच त्यांची गुणवत्ता फुलवली गेली आणि तिथूनच ते आयकॉन ठरले. हिंदुस्थानातल्या इतर प्रदेशांनी खेळाच्या बाबतीत हरयाणाचा आदर्श ठेवावा.