अर्जुन बबुता व रमिता जिंदल या हिंदुस्थानी नेमबाजांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरी गाठली. या दोघांकडूनही देशवासीयांना उद्या (दि. 29) पदकाची अपेक्षा असेल.
पुरुष गटात अर्जुन बबुताने सातव्या स्थानासह अंतिम फेरी गाठली, तर संदीप सिंह 12व्या स्थानी राहिल्याने स्पर्धेतून बाहेर झाला. अर्जुनने 105.7, 104.9, 105.5, 105.4, 104.0 व 104.6 असे एकूण 630.1 गुण मिळवले. महिला गटात रमिता जिंदलने अंतिम फेरी गाठून इतिहास घडवला. 20 वर्षीय रमिता 631.5 गुणांसह अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. उद्या दुपारी एक वाजल्यापासून अंतिम फेरी रंगणार आहे.