मुलांना सोशल मीडियासाठी पालकांची परवानगी सक्तीची, नियम मोडल्यास कंपनीला 250 कोटींचा दंड

देशात मुलांना सोशल मीडिया अकाऊंट उघडण्यासाठी आता पालकांची परवानगी सक्तीची करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने डिजिटल डेटा प्रोटेक्शन कायद्यांतर्गत आज याबाबतचा मसुदा जारी केला.

सरकारने संसदेत ऑगस्ट 2023 मध्ये डिजिटल डाटा सुरक्षा विधेयक मंजूर करून घेतले होते. सरकारने जनतेकडून या मसुद्यावर 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत आपल्या हरकती व सूचना मागवल्या आहेत. याबाबत हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहेत. त्यानंतर सरकार याबाबत विचार करणार आहे. एखाद्या कंपनीने नियमांचे किंवा कायद्याचे उल्लंघन केले तर त्या कंपनीला 250 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूदही करण्यात येणार आहे.