Parbhani News – दीड लाख रुपयांची लाच घेताना क्रीडा अधिकारी अडकल्या, एसीबीने केली मोठी कारवाई

परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कविता नावंदे यांनी स्विमिंग पूल बांधण्यास परवानगी देण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती. यातीलच दीड लाखांची लाच घेताना एसीबीने त्यांना रंगेहात पकडले आहे. या घटनेने जिल्ह्यातील क्रीडा विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.

क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी एका क्रीडा स्पर्धेचे बिल आणि स्विमिंग पुल मान्यतेसाठी लाच मागितली होती, असं बोललं जात आहे. याचाच मंजुरीसाठी त्यांनी संबंधितांकडे अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती. ज्यात दीड लाख रुपये स्वीकारताना त्यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी एसीबीकडून पुढील कारवाई केली जात आहे.