परभणी हिंसाचार प्रकरणात पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने 10 लाखांची मदत देण्यात अली होती. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी ही मदत नाकारल्याचे बातमी समोर येत आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, सोमनाथ यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोप पोलिसांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत शासकीय मदत स्वीकारणार नाही.
दरम्यान, परभणीमध्ये 10 डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती. यामुळे संतप्त नागरिकांनी 11 डिसेंबरला जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान जाळपोळ व दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळी अटक केलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच सोमनाथ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.