मुंबई-नाशिक रेल्वे प्रवास आणखी गतिमान होणार, समांतर मार्गिका टाकण्याचा निर्णय 

फोटो - संदिप पागडे
मुंबई ते नाशिकपर्यंतचा रेल्वे प्रवास आणखी गतिमान होणार आहे. मुंबई ते नाशिकदरम्यान सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वेमार्गावर समांतर रेल्वे मार्गिका टाकण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी चार हजार कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
नवीन समांतर मार्गिका जवळपास 140 किलोमीटर लांबीची असणार आहे. कसारा घाट ते मनमाड यादरम्यान समांतर मार्गिकेचे बांधकाम करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर घाटातील चढणीचा अडथळा दूर होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. नवीन मार्गिकेवर 12 बोगदे असणार आहेत. ते घाटातील उंच उतारांवर नियंत्रण ठेवू शकणार आहेत. समांतर मार्गिकेमुळे कमी वेळेत मुंबईतून नाशिक गाठता येणार आहे.