हॉटेलमध्ये मिळणारे पनीर व्हेजिटेबल ऑईलपासून बनते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा दावा

हॉटेलमध्ये मिळणारे पनीर हे दुधापासून नाही, तर ते व्हेजिटेबल ऑईलपासून तयार होते, असा खळबळजनक दावा मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी केला.

नाशिकमधील स्वामी समर्थ सेवा केंद्राने आयोजित केलेल्या कृषी महोत्सवात विखे पाटील बोलत होते. गुजरातच्या अमूल समूहाने राज्यातील दुग्ध व्यवसाय काबीज केल्याचे त्यांनी समर्थन केले. हा समूह चाळीस लाख लिटर दूध खरेदी करतो म्हणून राज्यातील दूध संकलन टिकून आहे. पुढील दीड वर्षात दूध उत्पादनाचे मोठे आव्हान राज्यापुढे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. हॉटेलमध्ये जे पनीर मिळते ते दुधापासून नव्हे तर, व्हेजिटेबल ऑईलपासून तयार केलेले असते, असा दावाही त्यांनी केला.

नाशिकमध्ये बोगस कीटकनाशके

नाशिकमध्ये सर्वात जास्त बोगस म्हणजे बनावट कीटकनाशके तयार होत असून, यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढतेय. रासायनिक खतांचा परिणाम नव्या पिढीवर होत आहे. जैविक खतांचा वापर केला गेला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.