वर्षभरातील विविध सण – उत्सवादिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक व मनमोहक सजावट केली जाते. त्याप्रमाणे मकरसंक्रांती सणानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली आहे.
गाभारा, चारखांबी, नामदेव पायरी येथील भाग सजावटीने आकर्षक व मनमोहक दिसत आहे.
त्यासाठी 500 किलो लाल गोंडा, 500 किलो पिवळा गोंडा, 200 किलो शेवंती, 50 किलो गुलछडी, 500 किलो कामिनी व 100 किलो ऍस्टर फुलांचा तसेच वांगी, गाजर, कारले, वाटाणा, पावटा, डबल बी ,भोपळा, लाल पापडी, पांढरी पापडी इत्यादीचा वापर केला आहे.
सदरची सजावट राहुल ताम्हाने, पुणे यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत केली आहे.
या सजावटीसाठी सुमारे 50 कामगारांनी परिश्रम घेतले.