
येत्या 8 एप्रिल रोजी चैत्र शुद्ध एकादशीचा सोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे 7 ते 9 एप्रिल या कालावधीत श्रीक्षेत्र पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिर आणि मंदिर परिसरात नारळ विक्री व नारळ फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच पंढरपुरात मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. चैत्र शुद्ध एकादशीला पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी होते. त्यादृष्टीने नारळ फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे.