राष्ट्रीय मानांकन सुपर सीरिज टेनिस स्पर्धा – विष्णू पांडेचा मानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का

मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या विष्णू पांडेने दुसऱ्या मानांकित कबीर गुंदेचाचा 6-2, 6-4 असा पराभव करून एमएसएलटीए अनिकेत वाकणकर टेनिस अकादमी पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन सुपर सीरिज 12 वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अनपेक्षित निकाल नोंदवला.

एनसीएल टेनिस सेंटर आणि सीपीआर टेनिस कोर्ट, पाषाण येथे ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेत दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित हर्ष नागवानीने आरुष पांडेचा 6-4, 6-1 असा, तर सहाव्या मानांकित महाराष्ट्राच्या अनय सुमंतने केरळच्या देवीन पित्तनचा 6-3, 6-1 असा पराभव केला. तिसऱ्या मानांकित अहान जैनने वेद परदेशीवर 6-4, 6-2 असा विजय मिळवला. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या अबीर सुखानीने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या रेयांश गुंडचा 6-1, 6-4 असा पराभव केला.

मुलींच्या गटात अव्वल मानांकित महाराष्ट्राच्या मायरा शेख हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत कर्नाटकच्या आहाना भटचा 6-1, 6-1 असा सहज पराभव केला. सातव्या मानांकित आदिरा भगतने सान्वी गोसावीला 6-3, 6-0 असे नमविले. चौथ्या मानांकित महाराष्ट्राच्या सतेश्री नाईकने आंध्र प्रदेशच्या अवनी गोपीरेड्डीचा 6-4, 6-4 असा पराभव केला. अटीतटीच्या लढतीत सहाव्या मानांकित तस्मई पोहाकरने समीक्षा शेट्टीचा 6-4, 4-6, 6-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला.

निकाल –

दुसरी फेरी मुले – हर्ष नागवानी (1) (महाराष्ट्र) वि.वि. आरुष पांडे (महाराष्ट्र) 6-4, 6-1; अनय सुमंत (6) (महाराष्ट्र) वि.वि. देवीन पित्तन (केरळ) 6-3, 6-1; अहान जैन (3) (महाराष्ट्र) वि.वि. वेद परदेशी (महाराष्ट्र) 6-4, 6-2; अहान भट्टाचार्य (5) (महाराष्ट्र) वि.वि. स्वराज भोसले (महाराष्ट्र) 6-4, 6-2; अबीर सुखानी (महाराष्ट्र) वि.वि. रेयांश गुंड (महाराष्ट्र) 6-1, 6-4; कुमार कौटिल्य (7) (छत्तीसगड) वि.वि. दोहद कसले 6-3, 6-2; विष्णू पांडे (महाराष्ट्र) वि.वि. कबीर गुंदेचा (2) (महाराष्ट्र) 6-2, 6-4.

मुली – मायरा शेख (1) (महाराष्ट्र) वि.वि. आहाना भट (कर्नाटक) 6-1, 6-1; आदिरा भगत (7) (महाराष्ट्र) वि.वि. सान्वी गोसावी (महाराष्ट्र) 6-3, 6-0; सतेश्री नाईक (4) (महाराष्ट्र) वि.वि. अवनी गोपीरेड्डी (आंध्र प्रदेश) 6-4, 6-4; तस्मई पोहाकर (6) (महाराष्ट्र) वि.वि. समीक्षा शेट्टी (महाराष्ट्र) 6-4, 4-6, 6-4; गार्गी ओक (8) (महाराष्ट्र) वि.वि. इसवीला निकोलाकी 6-0, 6-0; सेजल जाधव (5) (महाराष्ट्र) वि.वि. मोक्षिता खंडेलवाल (दिल्ली) 6-2, 6-3; शौर्या पाटील (2) (महाराष्ट्र) वि.वि. ईशना नायडू (महाराष्ट्र) 6-2, 6-4.